चिमुकल्यांनी केली आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मदत

0

मुक्ताईनगर : येथील आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुलमधील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी पैसे गोळा करुन कोथळी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले. विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.

आदर्श स्कुलमधील सहावीचे विद्यार्थी वेदांत जोगी, आयुष वाडीले, हर्षराज मराठे, ओम चौधरी, धिरज बोरसे, विष्णू माळी, मयुर पाटील, प्रसाद गावंडे, प्रणव गावंडे यांनी होप मिशन या संकल्पनेतून शालेचे मुख्याध्यापक नितीन पवार, वर्गशिक्षक भरत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब शालेय विद्यार्थ्यांना पैसे गोळा करुन शालेय साहित्य देण्याचे ठरविले.

शनिवार 24 रोजी कोथळी येथील कै. गणपतराव खडसे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन्सिल आदी साहित्य देण्यात आले. याप्रसंगी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक राजेश पाटील, शिक्षक भरत काळे यांसह विद्यार्थी उपस्थित होते.