चिनावल येथे तणावपूर्ण शांतता; 10 जण अटकेत

0

रावेर । काल तालुक्यातील चिनावल येथे झालेल्या आठवडे बाजारातील बाचाबाचीचे दंगलीत रुपांतर झाल्याने 15 जण जखमी होऊन गावातील घरे, दुकाने, मोटारसायकली, रिक्षा यांचे मोठे नुकसान झाले होते. तथापि काल दुपारपासून आज दिवसभर शांतता कायम असून दोन्ही गटांनी एकमेकाविरोधात फिर्यादी दाखल केल्या आहेत.

आज पोलीसांनी गावात नुकसानीची पाहणी करुन बंदोबस्त वाढवला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार ठाकूर, सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी येथे तळ ठोकून आहेत.

भाजीविक्रीच्या दुकानाच्या जागेवरुन वाद
ही घटना भाजीपाला विक्री करणार्‍या संगिता गाजरे यांच्या बाजारात बसण्याच्या जागेवरुन वादातून घडली. तिला व तिच्या पतीला शे.सत्तार, शे.सुपडू याने आमच्या जागेवर का बसली असे म्हणत मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या भावांनीही मारहाण केली जमावाने बाजारातून गावात दुकानावर, घरावर दगडफेक करुन नुकसान केल्याचे मला समजले अशी फिर्याद गौरी भंगाळे यांनी दिल्याने या आरोपींविरुध्द सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे काल प्रथम गौरी भंगाळे यांच्या घराकडे काही लोक घरे व दुकानांवर दगडफेक करीत येत होते शे.कय्याम शे.कुतुबुद्दीन (रा. चिनावल) व सोबत सुमारे 50 जणांचा जमाव दगडफेक करुन गल्लीतील दुकाने फोडत होते. चतुर ईच्छाराम महाजन व आशिष सोनार यांच्या गाड्यांचे लाठ्या-काठ्या, लाथांनी नुकसान करीत होते. या जमावाने माझ्या घराच्या काचा फोडल्या व शस्त्राचा धाक दाखवून घरांतील सोन्याचे मंगळसूत्र (1 तोळा), बांगड्या 1 तोळा असे 60 हजार रुपये किंमतीचे दागीनेही चोरुन नेले. काही महिलांना शिवीगाळ करीत विनयभंगही केला या प्रकाराने आपण घाबरुन आरडा-ओरडा करीत होते त्यावेळी शेजारचे लोक बाहेर आले तेव्हा त्यांनाही या जमावाने मारहाण केली. त्यात 10 जण जखमी झाले. दुसर्‍या फिर्यादीत फिर्यादी जाकीर शेख जहागीर (रा. चिनावल) यांनी योगेश राजाराम भंगाळे याने गालात थप्पड मारुन कपडे फाडले व गळ्यातील पोत तोडून घेऊन गेले.