चित्र-शिल्प संमेलनाला कणकवलीत प्रारंभ

0

मुंबई । कणकवलीत पहिले अखिल भारतीय चित्र – शिल्पकला संमेलन आयोजन केले असल्याची माहिती अखंड लोकमंच सिंधुदुर्गचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी दिली. 11 ते 13 मार्च या कालावधीत हे संमेलन होत आहे. या संमेलनात कला, इतिहास, सौंदर्यशास्त्र आणि अभिरुची या विषयांवर परिसंवाद होतील. या पहिल्या संमेलनासाठी निवडक विचारवंत व प्रयोगशील कलावंतांना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते, विजयकुमार बागुडी दीपक घारे, अरिवद हाते, पंकज भांबूरकर, दिलीप वारंग, सुनील महाडिक सहभागी आहे. मुकुंद कुळे, गणेश विसपुते, विनायक परब निरिक्षक म्हणून सहभागी आहेत, ललित कलांनीच समाज प्रगल्भ बनतो

ललितकला समाजाला प्रगल्भ बनवतात
समाजाचे सांस्कृतिक वैभव भौतिक श्रीमंतीपेक्षा माणसाला समृद्ध करीत असते. समाजाला जसा राजकारणाचा एक चेहरा असतो, तसा त्याला समांतर दुसरा सांस्कृतिक चेहरा असतो. ललित कलांच्या संगमांचा प्रवाह सशक्त होत जातो; तेवढा समाज वैचारिकदृष्टया अप्रगल्भ होत असतो. आपल्याकडे साहित्य, नाटय, संगीत कलांची संमेलने आयोजित केली जातात. या संमेलनांना सहयोग देऊन ही संमेलने नेटकेपणाने पुढे नेण्यासाठी योगदान देणार्‍या चित्र, शिल्प, छायाचित्रण आणि नेपथ्य आदी कलांचे संमेलन झालेले नाही. म्हणून अखिल भारतीय चित्र – शिल्पकला संमेलनाचे आयोजन आहे. मूलभूत हेतू साध्य करण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील याचा आढावा घेण्याचा प्रयत्न व भविष्यात संमेलनाला राष्ट्रीय स्वरूप यावे यादृष्टीने विचार होणार आहे. चित्र व शिल्पकलेशी संबंधित प्रचलित अभ्यासक्रम, व्यावसायिक, प्रायोगिक तथा उपयोजित स्तरावर कोणते परिणाम घडवून आणतो, त्यातील बलस्थाने आणि उणिवांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न आहे.हाती येणारे निष्कर्ष शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे गझलनवाझ भीमराव पांचाळे यांचे गझल गायन व संवाद, उस्ताद अब्रार अहमद यांचे संतूरवादन, दशावतार व चित्रकथी या लोककलांचे सादरीकरण होणार आहे.