चित्र रंगवा स्पर्धेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

0

भुसावळ। येथील खडका शिवारातील सर क्लायमेट इंग्लिश स्कुलमध्ये ज्यु. के.जी. व सिनी. के.जी. मधील विद्यार्थ्यांच्या बुध्दिमत्तेला वाव मिळावा तसेच त्यांच्यातील कलाविषयक सुप्त गुणांना चालना देण्यासाठी चित्र रंगवा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. यात विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मो. हनिफ, रमण झांबरे, जे.बी. खान, एलिजाबेथ मॅथ्यू आदी मान्यवर उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ए.एस. खान, शिल्पा आराक, वैशाली खराटे, इकबाल तडवी, रियाज तडवी आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन ए.जे. खान यांनी केले.