चिडलेल्या रविनाने नेटकऱ्यांना फटकारले

0

मुंबई : बॉलीवूडची एक दमदार अभिनेत्री रविना टंडनने ट्विटरच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या शोषणाविषयी एक पोस्ट केली होती. रविनाची ही पोस्ट वाचताच अनेकांनी तिला ट्रोल केलं. काहींनी तर या पोस्टचा संबंध अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्यासोबत जोडला होता. परंतु या लेखाचा अक्षय-ट्विंकलसोबत संबंध जोडल्यामुळे रविना चांगलीच चिडली.

‘कामाच्या ठिकाणी महिलांचं शोषण होतं असल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. परंतु पुरुष असं का करतात हे समजतं नाही अनेक वेळा महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. यामुळे महिलांचं करिअर उद्धवस्त होतं. परंतु त्यावेळी महिला निमूटपणे सहन करतात’,असं रविनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. ‘माझ्या भूतकाळात काय झालं आहे हे नीट समजून न घेता काही जण त्या घटनेचा येथे संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा हा लेख माझ्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत नाही तर सध्या कलाविश्वात महिलांसोबत ज्या घटना घडत आहेत. त्याविषयी आहे, असं म्हटलं.

रविनाने उत्तर देत साऱ्यांच्याच प्रश्नांची उत्तर दिली आहेत.

Copy