चिखली पोलीस ठाण्याला घटस्थापनेचा मुहूर्त

0
चिखली : चिखली पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त काढण्यात आला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते बुधवारी (दि. 10) चिखली पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (दि.8) आठ पोलीस अधिकार्‍यांच्या चिखली पोलीस ठाण्यात नियुक्त्या करण्यात आल्या. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी सोमवारी काढले. नुकत्याच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 15 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून विवेक मुगळीकर यांची नियुक्ती करण्यात आली. तर पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे यांची नियुक्ती करण्यात आली. शनिवारी (दि. 6) चिखली पोलीस ठाण्यासाठी 100 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चिखली ठाण्यात नियुक्त अधिकारी
पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे (निगडी ठाणे ते चिखली ठाणे), सहायक पोलीस निरीक्षक सतिश सुरेश कांबळे (पिंपरी ठाणे ते चिखली ठाणे), सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश जगन्नाथ जगदाळे (निगडी ठाणे ते चिखली ठाणे), पोलीस उपनिरीक्षक संदिप अशोक बागुल (निगडी ठाणे ते चिखली ठाणे), पोलीस उपनिरीक्षक योगेश भास्कर शिंदे (निगडी ठाणे ते चिखली ठाणे), पोलीस उपनिरीक्षक भरत विठ्ठलराव चपाईतकर (पिंपरी ठाणे ते चिखली ठाणे), महिला पोलीस उपनिरीक्षक रत्नमाला त्र्यंबकराव सावंत (एमआयडीसी भोसरी ठाणे ते चिखली ठाणे), पोलीस उपनिरीक्षक मधुसुदन घुगे (पिंपरी ठाणे ते चिखली ठाणे) यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
Copy