चिखलीच्या ईसमाच्या अपघात मृत्यू ; मयताविरुद्ध गुन्हा

0

यावल- भरधाव दुचाकी घसरून ती पाटचारीत पडल्याने चिखलीच्या इसमाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुरुवातीला यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हा मृत्यू अपघाती असल्याने मंगळवारी सहाय्यक फौजदार एएसआय राजेंद्र काशीनाथ पाटील यांच्या फिर्यादीनुसार स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या सुनील डोंगर भील (54, चिखली, ता.यावल) विरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 6 सप्टेंबर रोजी यावल ते चिखली रोडवर भील हे दुचाकीने जात असताना पाटचारीत पडले होते. तपास उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.

Copy