चिंताजनक: 24 तासात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ

0

नवी दिल्ली:जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोना ग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. गेल्या २४ तासांत करोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून आत्तापर्यंतचे ही सर्वाधिक मोठी संख्या आहे. २४ तासांत 9 हजार ३०४ नवे रूग्ण आढळून आले आहेत. शहरातून गावाकडे येणाऱ्यांमुळे आता ग्रामीण भागांतही कोरोनाने शिरकाव केले आहे.

मागील २४ तासांत २६० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सहा हजार ७५ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. २४ तासांत ९ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधितांची वाढ झाल्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या दोन लाख १६ हजार ९१९ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक लाख ४ हजार १०७ जणांनी करोनावर मात केली आहे. तर एक लाख सहा हजार ७३७ जणांनर उपचार सुरू आहेत.

Copy