चिंताजनक! २४ तासांत राज्यात १००८ तर देशात २२९३ रुग्ण वाढले

0

नवी दिल्ली – सुमारे दीड महिन्यापासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिगच्या अंमलबजावणीनंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १००८ तर देशात २२९३ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३३६ तर राज्यातील एकूण संख्या आता ११५०६ झाली आहे. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे

आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत २ हजार २९३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर या २४ तासांत देशभरात ७१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळपर्यंत देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ३३६ पर्यंत पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे देशभरात आतापर्यंत ९ हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत १८७९ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.