चिंताजनक: देशातील कोरोनाबाधितांची संख्या १५ लाखांच्या पुढे

0

नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनावर अद्यापही लस निर्माण झालेली नाही. संपूर्ण जगात कोरोनाची लस तयार करण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. मात्र एकाही देशाला यात अद्याप यश आलेले नाही. मात्र सख्या झपाट्याने वाढत चालली असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातील करोनाबाधितांच्या संख्येने आता १५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर मागील २४ तासांत देशात ४८ हजार ५१२ नवे करोनाबाधित आढळले तर ७६८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १५ लाख ३१ हजार ६९९ वर पोहचली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने देशात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ९ हजार ४४७ आहे. तर, ९ लाख ८८ हजार ३० जणांना आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. देशात आतापर्यंत करोनामुळे ३४ हजार १९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.