चिंताजनक! जळगाव जिल्ह्यात कोरोनाची अर्धशतकाकडे वाटचाल…

0

जळगाव – काही दिवसांपुर्वी ऑरेेंज झोन असलेल्या जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेेंदिवस वाढत आहे. गेल्या बारा तासात जिल्ह्यात सहा रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४३ वर पोहचली आहे. हॉटसस्पॉट ठरलेलल्या अमळनेर नंतर आता भुसावळचीही त्याच मार्गावर वाटचाल सुरु झाल्याने जिल्हा प्रशासनाची डोकंदुखी वाढली आहे.

जळगावात कोरोनाचे दोन रूग्ण आढळल्यानंतर खळबड उडाली होती. त्यानंतर पंधरा दिवस कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून न आल्याने पप्रशासनाने सुटकेचा िनिशश्‍वास टाकला होता मात्र अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यानंतर संख्येत सातत्याने वाढ होवून अमळनेर हॉटस्पॉट ठरला आहे. आता जळगाव येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी एकूण ४७ व्यक्तीचे तपासणी अहवाल शुक्र वारी प्राप्त झाले होते. त्यात अमळनेर येथील एक, जोशीपेठ, जळगाव येथील एक तर पाचोरा येथील दोन अशा चार व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर काही तास उलटत नाही तोच शनिवारी सकाळी दोन व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून दोन्ही व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या दोन्ही व्यक्ती भुसावळच्या आहेत. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४३ इतकी झाली आहे. त्यापैकी बारा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने ही साखळी तोडण्याची आवश्यकता आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Copy