चिंताजनक ; कोरोनाने जिल्ह्यात दिवसभरात 15 जणांचा मृत्यू

0

 

जळगाव – जिल्ह्यात दिवसभरात आज कोरोनामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील 4 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आज नव्याने 183 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या 8187 वर पोहचली आहे.

जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहेत. यात जिल्ह्यात मंगळवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 39, जळगाव ग्रामीण 12, भुसावळ 6, अमळनेर 4, चोपडा 25, पाचोरा 20, धरणगाव 13, यावल 4, एरंडोल 3, जामनेर 12, रावेर 12, पारोळा 13, चाळीसगाव 5, मुक्ताईनगर 10, बोदवड 5 अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे आज दिवसभरात 15 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील 4, धरणगाव, चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी 2, जळगाव तालुका, जामनेर, पाचोरा, यावल, रावेर, चोपडा व अमळनेर या तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली. तर दुसरीकडे दिलादायक बाब म्हणजे आतापर्यंत 5 हजार 251 कोरोनामुक्त झाले आहेत.

Copy