चिंताजनक: कोरोनाचा पुन्हा त्रिशतक: दिवसभरात पाच मृत्यू

जळगाव: गत २४ तासांमध्ये जिल्ह्यात ३३६ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून याच कालावधीत पाच रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.
जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या माहितीनुसार गत चोवीस तासांमध्ये ३३६ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात १५२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज जिल्ह्यातील पाच रूग्णांचा मृत्यू झाला असून यामुळे आजवरच्या कोरोना बळींची संख्या १३९४ इतकी झालेली आहे.

दरम्यान, गत चोवीस तासांमध्ये सर्वाधीत कोरोना बाधीत रूग्ण जळगाव शहरात १६९ इतके आढळून आले आहेत. याच्या खालोखाल चोपडा-५१ तर चाळीसगाव २३ इतके पेशंट आढळून आले आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता; जळगाव तालुका-१४; भुसावळ-१२; एरंडोल व अमळनेर-३; बोदवड, पाचोरा, व भडगाव प्रत्येकी-२; धरणगाव-१६; यावल-८; जामनेर व रावेर प्रत्येकी-५; पारोळा व मुक्ताईनगर प्रत्येकी-९ आणी इतर जिल्ह्यांमधील तीन असे रूग्ण आढळून आले आहेत.

Copy