चिंचोलीत 24 वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या 

यावल : तालुक्यातील चिंचोली येथील 24 वर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भूषण संतोष पाटील (24) असे मयत तरुणाचे नाव आहे.

आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट
यावल तालुक्यातील चिंचोली येथील भूषण पाटील हा आई-वडीलांसोबत वास्तव्यास होता. अहमदाबाद येथे तो एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. गेल्या महिन्यापासून भूषण हा चिंचोली येथे आलेला होता. सोमवार, 4 जुलै रोजी सकाळी त्याचे आई व वडील हे शेतात कामासाठी निघून गेले. त्यावेळी भूषण हा घरी एकटाच होता. घरात कुणीही नसतांना त्यांना राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकूलत्या एक मुलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समजताच आई-वडीलांना टाहो फोडला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.