चिंचोलीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला : रोकड सुरक्षित

Attempt to break ATM in Chincholi Failed : Cash Safe जळगाव : जळगाव तालुक्यातील चिंचोली गावातील आरबीएलचे एटीएमचे फोडण्याचा प्रयत्न सुदैवाने फसला. हा प्रकार सोमवार, 3 ऑक्टोंबर रोजी समोर आला असून जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तीन चोरटे कैद झाले असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

लॉकर उघडले मात्र रक्कम सुरक्षित
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे आरबीएल बँक असून या बँकेच्या शेजारीच एटीएम मशीन लावण्यात आले आहे. येथे गोपाल बाविस्कर हा सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजता गोपाल बाविस्कर हा सुरक्षा रक्षक नेहमीप्रमाणे कामावर आल्यानंतर त्यास मशीनच्या लॉकचा दरवाजा उघडा दिसताच त्याने बँकेचे मॅनेजर सोहेल मुख्तार देशमुख यांना माहिती दिली. सोहेल देशमुख यांनी मशीनची पाहणी केल्यानंतर एटीएम मशीनमधील इतर कोणेतेही पार्ट उघडे नसल्याचे व रक्कम सुरक्षित असल्याचे दिसून आले मात्र मशीनच्या लॉकरचा दरवाजा तोडण्यात आल्याने त्यांनी जळगाव एमआयडीसी पोलिसात अज्ञातांविरोधात तक्रार नोंदवली आहे. तपास पोलिस नाईक मुदत्सर काजी करीत आहेत.