चिंचवार, खलाणेतून अल्पवयीन तरुणींना पळवले : पोलिसात गुन्हा दाखल

0

धुळे- तालुक्यातील चिंचवार येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे आमिष दाखवून अपहरण केल्याप्रकरणी संशयीत दीपक रमेश पवारविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्‍या घटनेत शिंदखेडा येथील सेंट्रल बँकेच्या आवारातून 16 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. मनोज संतोष ननवरे याने तिचे आमिष दाखवून अपहरण केले, असा संशय मुलीच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Copy