चिंचवडमध्ये तरुणीला मारहाण

0

चिंचवड : मोबाईल पॅटर्न लॉक सांगितला नाही म्हणून 19 वर्षीय तरुणीला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाजवळ घडली. या प्रकरणी 19 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संभाजी गुलाब शेलार (वय 30, रा. सोमाटणे फाटा, तळेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने संबंधित तरुणीला जबरदस्तीने त्याच्या गाडीत बसविले. तिला तिच्या मोबाईलचा पॅटर्न लॉक विचारला. तो न दिल्याने त्याने कमरेच्या पट्ट्याने तिच्या तोंडावर, हातावर मारुन जखमी केले. यावरून तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.a

Copy