चिंचवडच्या दोन मैत्रिणींनी लावला वाहनाच्या आधुनिक इंडीकेटरचा शोध

0

पिंपरी चिंचवड : चिंचवड येथील अंकिता अशोक नगरकर आणि रत्ना पाटील या दोन मैत्रिणींनी वाहनांच्या आधुनिक इंडिकेटरचा शोध लावला आहे. वाहनाच्या छतावर असलेल्या आधुनिक इंडीकेटरचे त्यांनी पेटंट रजिस्टर केले आहे. यामध्ये अंकिताचे हे 10 वे पेटंट आहे.

अल्प खर्चात उपलब्ध होणार इंडीकेटर…

शोधलेले आधुनिक इंडीकेटर हे वाहनांच्या छतावर बसवलेले असल्याने ट्रकसारख्या उंच वाहन चालकांना देखील स्पष्टपणे दिसून येते. या शोधामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. कंपनीने वाहनांना बसविलेल्या इंडीकेटर सोबतच हे छतावरचे इंडीकेटर देखील कार्य करेल. अल्प खर्चात आणि कमी वेळात इंडीकेटर बसविता येणे शक्य आहे. आर टी नियमानुसार पिवळा रंग तसेच त्यावर असणार्‍या प्लास्टिक कव्हरमुळे प्रकाशाची तीव्रता प्रमाणात आहे. हा इंडीकेटर जगभरात वापरला जाण्याची शक्यता दोन्ही मैत्रिणींनी वर्तविली आहे.

अपघात रोखण्यासाठी मदत…

वाहन क्षेत्रात सततचे होणारे अपघात व त्यातून होणारे मृत्यू, तसेच त्यातून येणारे अपंगत्व हे संपूर्ण जगासमोर एक मोठी समस्या बनली आहे. त्यावर उपाययोजना करणे, त्या संबधीत संशोधन करणे, हे कार्य शास्त्रज्ञ अविरतपणे करीत आहे. यात खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. माझे स्टेपलरच्या संशोधनासह 9 पेटंट रजिस्टर आहे. या आधुनिक इंडीकेटरचे फायदे सांगताना अंकिता म्हणाली की, प्रचलित वाहनांना इंडीकेटर चार ठिकाणी लावलेले असतात. आम्ही शोधलेले इंडीकेटर हे गाडीच्या छतावर दोन्ही बाजूने एलईडी बल्बची पट्टीच्या स्वरुपात आहे. ज्या बाजुला वळायचे आहे ती पट्टी ब्लिंक होत राहते.