चिंचपाड्यात ट्रायसिकलचे वितरण

0

नवापूर । तालुकयातील चिंचपाडा येथे उदयोगपती विपिनभाई चोखावाला यांच्या आर्थिक सहकार्याने तीन ट्रायसिकल व एक व्हिलचेअरचे वितरण तहसीलदार प्रमोद वसावे, विपिनभाई चोखावाला, मिशन हॉस्पिटलचे डॉ.दिपक सिंग यांच्या हस्ते गरजूंना करण्यात आले. यावेळी सायकल स्वीकारतांना या गरजूंच्या व परिवाराच्या चेहर्‍यावर एक आगळा वेगळा आनंद व उत्साह दिसत होता.

व्यसनमुक्त सेंटरसाठी प्रयत्न करणार
यावेळी चोखावाला म्हणाले की, या हॉस्पिटल सोबत माझे 1965 पासून संबंध असून या हॉस्पिटलशी मी चांगला परिचित आहे. लोकांना दारू सोडण्यासाठी सेंटर सुरू करण्याची मागणी देखील त्यांनी केली. तहसीलदार प्रमोद वसावे यांनी सांगितले डेनीयल माझ्याशी चर्चा केली यथायोग्य मदत मिळविण्याचा प्रयत्न केला यापुढे यथायोग्य मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन दावीद थोरात तर प्रास्ताविक दानियल कोटिकर यांनी केले.