Private Advt

चिंचगव्हाण तांडा येथे झोपड्यांना आग

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण तांडा येथे दोन झोपड्यांना आग लागल्याने संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले. या आगीमुळे दोन कुटुंब उघड्यावर आले आहे.

दोन झोपड्या आगीत आग
चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण तांडा क्रमांक चारमध्ये झोपड्यांची वस्ती असून या ठिकाणी विजय शेनफडू मोरे (42) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार, 28 एप्रिल रोजी तांडा येथील सर्व मजूर शेतावर कामाला गेले असता उष्णतेमुळे उसाच्या पाते टाकलेल्या झोपडीला अचानक आग लागली. काही क्षणातच झोपडीने मोठी आग घेतली. त्यांच्या झोपडीच्या बाजूला सोमनाथ ठाकरे यांची झोपडीला देखील आग लागली. आग लागल्याने समजताच शेजारी राहणार्‍या नागरीकांनी तातडीने धाव घेवून आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतू या आगीत झोपडीसह संसारोपयोगी वस्तू जळू खाक झाल्याने 85 हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी विजय मोरे यांच्या खबरीवरून मेहुणबारे पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक अन्वर तडवी करीत आहे.