चाळीसगाव शहर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरु

0

चाळीसगाव । आगामी होणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलिस उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, सपोनि राजेंद्र रसेडे यांच्यासह पथकाने बुधवारी 11 फेब्रुवारी पहाटे 4 ते 6 वाजे दरम्यान शहरातील विविध भागात कोम्बिंग ऑपरेशन करून विविध गुन्ह्यात फरार असलेल्या 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

यावेळी शहर पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, सपोनि राजेश रसेडे, पोउनि प्रशांत दिवटे, पोलीस हवालदार अविनाश पाटील, पो.कॉ. नरेंद्र नरवाडे, गोपाळ भोई, पालवे यांनी पहाटे 4 वाजता सुरुवात केली. शहरातील संजय गांधी नगर, नागडरोड झोपडपट्टी, छोटी गुजरी, भीम नगर भागात सदर कोम्बिंग ऑपरेशन करून जवळपास 5 महिन्यांपासून कलम 307 मधील फरार आरोपी हरीश भास्कर चंदनशिव, हितेश अरुण रोकडे दोघे रा संजय गांधी नगर यांना ताब्यात घेतले आहे. त्याच प्रमाणे नागडरोड झोपडपट्टीतील 326 कलम असलेल्या गुन्ह्यात फरार असलेला अकील शेख फारुख शेख यास अटक करण्यात आली असून आरोपी रवींद्र नामदेव सपकाळे याला देखील अटक करण्यात आली आहे.