चाळीसगाव शहरात सीसीटीव्हीत कैद झाला दुचाकीस्वाराला उडविणारा ट्रक

0

मंगेश चव्हाण यांच्या दातृत्वातून बसविलेले कॅमेरे

चाळीसगाव- सीसीटीव्ही यंत्रणा म्हणजे कायदा आणि सुरक्षाव्यवस्थेचा तिसरा डोळाच असतो युवा उद्योजक मंगेश चव्हाणांच्या दातृत्वातून हे वीस लाख रुपयांचे कॅमेरे शहरात बसविण्यात आले आहेत व ही सर्व यंत्रणा पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या देखरेखीखाली आहे या यंत्रणेची मोठी मदत पोलिसांना वेळोवळी होत आहे याचा प्रत्यय आज दि.22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शहरातील वर्दळीच्या कॅप्टन कॉर्नर चौकात एका अज्ञात ट्रक ने एका दुचाकीस्वाराला धडक देऊन पसार झाला होता. संबंधित अपघात झालेल्या इसमाने घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि सदर पसार झालेला ट्रक त्याच्या क्रमांकासह शहरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आढळला. या फुटेज च्या आधाराने पोलीस आपला तपास करत असून लवकरच ट्रकचालकाच्या मुसक्या आवळल्या जातील. यामुळे खर्‍या अर्थाने पोलिसांचा तपासाला गती मिळणार आहे या घटनेमुळे एक गंभीर चाळीसगाव शहरात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मंगेश चव्हाण यांच्या दातृत्वातून बसविलेले कॅमेरे
चाळीसगाव सिसीटीव्ही यंत्रणा म्हणजे कायदा आणि सुरक्ष व्यवस्थेचा तिसरा डोळा आहे. युवा उद्योजक मंगेश चव्हाणाच्या दातृत्वातून हे वीस लाख रुपयां चे कॅमेरे शहरात बसविण्यात आले आहेत व ही सर्व यंत्रणा पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या देखरेखीखाली आहे या यंत्रणेची मोठी मदत पोलिसांना वेळोवळी होत आहे याचा प्रत्यय आज दि.22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शहरातील वर्दळीच्या कॅप्टन कॉर्नर चौकात एका अज्ञात ट्रक ने एका दुचाकीस्वाराला धडक देऊन पसार झाला होता. संबंधित अपघात झालेल्या इसमाने घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि सदर पसार झालेला ट्रक त्याच्या क्रमांकासह शहरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आढळला. या फुटेज च्या आधाराने पोलीस आपला तपास करत असून लवकरच ट्रकचालकाच्या मुसक्या आवळल्या जातील. यामुळे खर्‍या अर्थाने पोलिसांचा तपासाला गती मिळणार आहे या घटनेमुळे एक गंभीर गुन्हा करून पळून जाणारा ट्रक सापडणार आहे.

सर्वोत्कृष्ट दर्ज्याचे सीसीटिव्ही कॅमेरे -मंगेश चव्हाण
राज्यातील मेट्रो सिटीत बसविण्यात येणार्‍या दर्जाचे हे सीसीटिव्ही कॅमेरे चाळीसगावात विविध सात चौकात बसविले आहेत सिग्नल चौक, तहसील कार्यालय चौक, नागद चौफुली, खरजर्ई चौक, नवीन हिरापुर रोड नाका, रेल्वे स्टेशन, महाराणा प्रताप चौक कॉलेज पॉइंट या सह शहराच्या मुख्य बाजारपेठ ठिकाणी ही सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत आज या यंत्रणेमुळे पोलिसांना अपघात करणारा ट्रक पकडला गेला असल्याचे मला कळाले याचे समाधान वाटते आहे अशी भावना मंगेश चव्हाण यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना व्यक्त केली आहे.

Copy