Private Advt

चाळीसगाव शहरात त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन

चाळीसगाव – प्रतिनिधी | शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची आज १२४ वी जयंती आहे. त्याअनुषंगाने शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील रमाबाई आंबेडकर नगरात रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती सोमवार रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते शिवाजी जाधव, मुकेशजी नेतकर, पंकज भालेराव यांनी माता रमाई यांचा जीवनपट उलगडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तत्पूर्वी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल चौधरी यांनीही प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी दिनेश मोरे, महेंद्र बिऱ्हाडे, दीपक जोंधळे, लालाभाऊ परदेशी, भुषण लाठे, बाबुराव सोनवणे, विजय सोनवणे, मुकेश मोरे, गोकुळ मोरे, सुरज मोरे, सोनू जेवरास, शेखर अहिरे, दादाभाऊ अहिरे, वडाळाचे उपसरपंच अभिषेक मोरे आदी उपस्थित होते