चाळीसगाव शहरात कुटूंब घराबाहेर झोपल्याची संधी साधत अडीच लाखांचा ऐवज लांबवला

Daring House Burglary In Chalisgaon : 2.5 Lakhs Instead Of Loot चाळीसगाव : कुटुंब घराबाहेर झोपल्याची संधी साधून चोरट्यांनी कोदगाव रस्त्यावरील महादू सखाराम अहिरे यांच्या शेतातील घरातून सोन्याचे दागिने व रोकडसह अडीच लाखांचा ऐवज लांबवला. ही धक्कादायक घटना सोमवार, 26 सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाज वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कुटुंब झोपल्याची साधली संधी
महादू अहिरे हे परीवारासह शेतात राहतात. शेती व बैल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करून ते परीवाराची उपजीविका भागवतात. रविवार, 25 रोजी सायंकाळी त्यांनी बैल विक्रीची उधारी जमा केलेली एक लाख 20 हजार रुपयांची रक्कम घरी आणली होती. सोमवार, 26 रोजी रात्री कुटुंब घराबाहेर झोपल्याची संधी चोरट्यांनी साधली. पहाटे 5.45 वाजेच्या सुमारास महादू अहिरे यांचा मुलगा झोपेतून उठला असता, त्याला घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्याने घरात जावून पाहिले असता, घरातील लोखंडी कपाटातील साहित्य खाली पडल्याचे दिसून आले.

शहर पोलिसात गुन्हा
चोरट्यांनी कपाटातून 12 हजार रुपये किंमतीचे तीन ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र, 12 हजार रुपये किंमतीचे तीन ग्रॅम वजनाच्या कानातील रींग, आठ हजार रुपये किंमतीचे दोन ग्रॅम वजनाचे पैंडल, एक हजार रुपये किंमतीचे अर्धा ग्रॅम वजनाची नथ व दोन लाख 10 हजार रुपयांची रोकड असा एकूण 2 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. महादू सखाराम अहिरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.