चाळीसगाव शहरातून 45 वर्षीय विवाहिता बेपत्ता

चाळीसगाव : शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्ग्यावर आलेली 45 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.

अचानक विवाहिता बेपत्ता
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील जया दिलीप माने (45) या विवाहितेचे गेल्या पंधरा वर्षांपासून मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांच्या आईने विवाहितेला चाळीसगाव शहरातील पीर मुसा कादरी बाबा दर्ग्यावर शनिवार, 4 डिसेंबर रोजी आणल्याने ते येथेच मुक्कामी राहिले. दरम्यान, रविवार, 5 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जया या लघूशंकेला जाऊन येते, असे सांगून निघाल्या मात्र खूप वेळ झाल्यावरही त्या मूळ ठिकाणी परतल्या नाहीत. आईने परीसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतु जया मिळून आल्याने चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात हरविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.