Private Advt

चाळीसगाव शहरातून अल्पवयीन मुलाचे अपहरण : अज्ञाताविरोधात गुन्हा

चाळीसगाव : शहरातील आदित्य नगरात राहणार्‍या 13 वर्षीय अल्पवयीन मुलास अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना रात्री उघडकीला आली. याप्रकरणी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पवयीन मुलास पळवून नेले
चाळीसगाव शहरातील आदित्यनगर येथील योगेश छोटू कोळी (13) हा अल्पवयीन मुलगा गल्लीत खेळत असताना अज्ञात इसमाने फुस लावून त्याला पळवून नेले. हा प्रकार सोमवारी रात्री 7.30 ते 8.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली. घरच्यांनी परीसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता योगेश हा मिळून न आल्याने व कुणीतरी त्याचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रीक्षा चालक असलेले वडील छोटू तानाजी कोळी (41) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम 363 प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनपाखाली सहा.निरीक्षक दीपक बिरारी करीत आहेत.