Private Advt

चाळीसगाव रेल्वे स्थानकातून 40 हजारांचा ऐवज असलेली पर्स लंपास

चाळीसगाव : धुळ्यातील महिला प्रवाशाला रेल्वे स्थानकावरील वेटींग रूममध्ये झोप लागताच 40 हजारांचा ऐवज असलेली पर्स अल्पवयीन मुलीने लांबवली. पर्समध्ये मोबाईलसह रोकड मिळून एकूण 39 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. ही घअना बुधवार, 27 रोजी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिसात अज्ञात चोरट्या महिलेविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात महिलेचा शोध सुरू
दर्शना सागर कोडगीर (26, संदीप लॉड्री बांबुगल्ली, धुळे) या पती व बहिणीसोबत मुंबई ते चाळीसगाव प्रवास करीत होत्या व चाळीसगाव रेल्वे स्थानकावर धुळे जाण्यासाठी मेमूच्या प्रतीक्षेत असताना हिरकणी कक्षात त्यांना रात्रीच्या प्रवासामुळे झोप लागली व ही संधी साधून बुरखाधारी महिलेने व तिच्या सोबत असलेल्या 10 ते 12 वर्षाच्या लहान मुलीने कोडगीर यांची पर्स लांबवली. पर्समध्ये 13 हजार रुपये किमंतीचा सॅमसंग मोबाईल फोन, 16 हजार रुपये किमंतीचा ऑपो प्रो मोबाईल, आणि रोख 10 हजार रुपये असा एकूण 39 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिसात दर्शना सागर कोडगीर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास कॉन्स्टेबल नागेश दंदी हे करीत आहेत. सीसीटीव्हीवरून लोहमार्ग पोलिसांनी संशयीत महिलेचा शोध सुरू केला आहे.