चाळीसगाव येथे शिवजयंती मिरवणूक सोहळानिमित्त बैठक

0

शेंदुर्णी । येथील शासकिय विश्रामगृह येथे येणार्‍या शिवजयंती निमित्त बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत येणारी शिवजयंती हि मागील वर्षाप्रमाणे प्रबोधनात्मक मिरवणूक सोहळा आयोजित करून साजरी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. सदर मिरवणुकीत सालाबदा प्रमाणे ढोल-ताशा पथक, प्रबोधनात्मक शिवकालीन देखावे, तुतारी व सनई वादन, उंट व घोडे यांच्यासह मल्लखांब आदींचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले. यावेळी नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक बापु अहिरे, नगरसेवक मानसिंग राजपूत, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, निलेश राजपूत, भाजपचे अरुण पाटील, राकेश नेवे, कपिल पाटील, राहुल पाटील, भावेश कोठावदे, कृष्णा कायस्थ, स्वप्नील यशोद, रोहन पाटील, विक्की देशमुख, रोहित कोतकर, तुषार गोत्रे,अमोल चौधरी, आकाश धुमाळ, सनी शिरसाठ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.