चाळीसगाव येथे राजमाता माँ जिजाऊ जयंती साजरी

0

चाळीसगाव । राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी बिग्रेड यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथम दीपप्रज्वलन प्रतिमा पूजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिजाऊ वंदना सादर करण्यात आली. प्रास्ताविकात जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा प्रा. साधना निकम यांनी सांगितले की जिजाऊंना अभिप्रेत बहुजन समाज संघटीत झाला तर निश्‍चितच महाराष्ट्रात सुराज्य निर्माण होईल. आताच्या बिकट परिस्थितीत महिलांनी खंबीर झाले पाहिजे. योगेश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, घराघरात जिजाऊ घडल्या तर निश्‍चितच शिवराय जन्माला येईल. सातत्याने अशा संस्कारक्षम विचारांचे प्रबोधन झाले पाहिजे, असे सांगत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती : जिजाऊ ब्रिगेडच्या सरोजिनी जाधव, सुरेखा पाटील, स्मिता पवार, संगिता पाटील, निता चव्हाण, कोमल पाटील, प्रा. शामकांत निकम, तर संभाजी ब्रिगेडचे किशोर पाटील, योगेश पाटील, कुशल देशमुख, देवेश देवकर, नरेंद्र सुर्यवंशी, विजय नवले, वाघचौरे, पानसरे, जोंधळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन निता चव्हाण यांनी तर आभार मोहिनी शितोळे यांनी केले.