चाळीसगाव येथे युवा नेत्तृत्व विकास कार्यशाळेचे आयोजन

0

चाळीसगाव । भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयाअंतर्गत असणाछया नेहरू युवा केंद्र आणि साद फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत येथील केकी मुस प्रतिष्ठान येथे 5 दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत युवा नेत्तृत्व विकास, व्यक्तीमत्व विकास, भारतीय राज्यघटना आणि युवा जेंडर अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन व चर्चा करण्यात येणार आहे. कार्यशाळेत 18 ते 25 वर्ष वयोगटासाठी मर्यादा असून या कार्यशाळेत कोणतेही शुल्क लागू करण्यात आलेले नाही. कार्यशाळेत एकुण 40 युवक – युवती सहभागी होतील. कार्यशाळेत सहभाग घेणार्‍यांना युवा क्रिडा मंत्रालय यांचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी 4 फेब्रुवारी अंतिम मुदत असून सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी सागर नागणे व कल्पतेश देशमुख यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन नेहरू युवा केंद्र संघठनतर्फे करण्यात आले आहे.