चाळीसगाव येथील दाम्पत्याच्या अ‍ॅक्टिवाला कारची धडक

0

चाळीसगाव । चाळीसगाव येथील शिक्षिका पत्नी सोबत भउर येथे ऍक्टिवा वर शेताकडे जात असतांना समोरून येणार्‍या आय -20 कार ने त्यांच्या ऍक्टिवाला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात सोमवार 10 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास भोरस फाट्या जवळील रोडवर दोघे गंभीर जखमी झाले होते. दोघांना धुळे येथे उपचारासाठी नेत असतांना पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या सुत्रानुसार कार मधील 3 जण जखमी झाले.

चाळीसगाव येथील रमाकांत सुकदेव गुंजाळ (35) व त्याच्या पत्नी मंगला रमाकांत गुंजाळ (वस्ती शाळा शिक्षिका अलवाडी – सायगाव जवळ पिरवाडी) हे त्यांच्या ऍक्टिवा वरून 10 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास चाळीसगाव धुळे रोड मार्गे भउर येथे शेतकडे जात असताना भोरस फाट्याजवळील मोरीजवळ धुळे कडून चाळीसगाव कडे भरधाव वेगाने येणार्‍या आय – 20 कार क्र (जीजे 01 आरके 4707 ) ने त्यांचा ऍक्टिवा (एमएच 19 सीएच 4976) ला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात रमाकांत सुकदेव गुंजाळ व त्यांच्या पत्नी सौ मंगला रमाकांत गुंजाळ हे गंभीर जखमी झाले होते. दोघांना उपचारासाठी धुळे येथे नेले असता रमाकांत गुंजाळ यांचा मृत्यू झाला असून मंगला गुंजाळ या गंभीर असून त्यांचे वर धुळे येथील निखिल शाह यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे कळते.