चाळीसगाव-मालेगाव प्रवास करणार्‍या तरुणांविरोधात गुन्हा दाखल; कर्तव्यात कसुर करणार्‍या पोलिसांची चौकशी

0

जळगाव – कोणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जिल्हा सीमा बंदीचे आदेश आहे. जिल्हा सीमा बंदीचे असतांनाही ७ ते २१ एप्रिलदरम्यान चाळीसगावहून मालेगाव व पुन्हा मालेगाव हुन चाळीसगाव प्रवास करणाऱ्या सुलतान अजीज खान वय – २४ धंदा – पेंटर रा.प्लॉट नं.८,काका निवास शेजारी,पवारवाडी चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच चाळीसगाव मालेगाव दरम्यान तपासणी नाक्यांवर संबंधित तरुणाची कुठलीही चौकशी न करता कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचीही सखोल चौकशी करण्यात येणार असून चौकशीअंती कारवाई होणार आहे

जिल्ह्यातील सीमांवर २४ तास पथके तैनात

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादृर्भाव होवु नये , त्याअनुषांने देशात तसेच राज्यात लॉक-डाऊन करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणुन जळगाव जिल्हयातील सीमांवर वर विशेष पथके नेमण्यात आलेले आहेत. सदरचे पथके हे सतत २४ तास हजर राहुन लॉक-डाऊन चे अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगाव जिल्हयातुन निर्गमन करण्यास प्रतिबंध ( सिमाबंदी ) आदेशाचे उल्लंघन कर-यावर कारवाई करण्यात येत आहे.

असा केला तरुणाने दुचाकीवरुन प्रवास

चाळीसगाव शहरातील हा दोन महीण्यापुर्वी सायने तालुका मालेगाव येथे घराचे पेन्टींग कामाकरीता गेलो होता त्यावेळी लाùकडाऊनमुळे तेथील काम बंद झाल्याने तो चाळीसगाव येथे परत आला.पुन्हा कामाचे पैसे बाकी असल्याने दि ७ रोजी चाळीसगाव येथुन त्याचे मोटार सायकलने सायने तालुका मालेगाव येथे गेला लॉक-डाऊन चालु असल्याने तो मालेगाव येथे त्याचे नातेवाईक यांचे कडेस राहीला होता. दि. २१ रोजी सकाळी दुचाकीने पुन्हा मालेगाव मधील नुराणी नगर येथुन निघुन चाळीसगाव चौफुली – दहीवाळ – गिरणाडॅम फाटा – कलवाडी – पिलखोड मार्गे येथे आला तेथुन टाकळी – आडगाव – देवळी – बिलाखेड व चाळीसगाव येथे प्रवास करीत येवुन चाळीसगाव येथील पवारवाडीतील त्याचे घरी पोहचला.

गुन्हा दाखल, तपासणी करुन केले होम क्वारंटाईन

सुलतान अजीज खान याने लॉक-डाऊन मध्ये नियमाचे उल्लंघन केल्याने त्याचे विरुध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याची वैदयकीय तपासणी करुन त्याचे डावे हातावर कोरोटाईनचा शिक्का मारण्यात येवुन त्यास होम कोरोटाईन करण्यात आले आहे.

जळगाव जिल्यातील नागरिकांना जळगाव जिल्हा पोलीस दलाचे वतीने आवाहन करण्यात येते की, जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जिल्हयातुन निर्गमन करण्यास प्रतिबंध करण्यात आले असुन जे कोणी सिमाबंदी आदेशाचे पालन करणार नाहीत त्याचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा – २००५ ,भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ (३) Indian Penal Code – १८६२ या कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच तपासणी नाक्यावर कर्तव्यावर कसुर करणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांवरही कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल- डॉ. पंजाबराव उगले, पोलिस अधीक्षक .

Copy