चाळीसगाव महाविद्यालयात ‘स्वछता ही सेवा’ उपक्रम

0

चाळीसगाव – येथील बी.पी.आर्ट्स एस.एम.ए. सायन्स के.के.सी.कॉमर्स कॉलेज आणि 48 माहाविद्यालय बटालियन धुळे यांच्यातर्फे राबविल्या जात असलेल्या “स्वछता ही सेवा”या उपक्रमातनंतर्गत शहरातील विविध ठिकाणी स्वछता मोहीम राबविण्यात येत असून या उपक्रमाचाच एक भाग म्हणून दि.24सप्टेंबर 2018 रोजी स्वर्गीय सुवर्णताई देशमुख उद्यानामध्ये स्वछता करण्यात आली.

याप्रसंगी या मोहिमेत व्ही.एच.पटेल प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन राजेंद्र चौधरी, प्राचार्य मिलिंद बिलदीकर, उपप्राचार्य अजय काटे, एन.सी.सी ऑफिसर प्रा.राजेश चंदनशिव यांच्या समवेत एनसीसी कॅडेडस यांनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायण भाऊ अग्रवाल, सिनियर कॉलेजचे चेअर मन डॉ.एम.बी.पाटील, ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन नानाभाऊ कुमावत, संस्थेचे संचालक योगेश अग्रवाल, डॉ.सुनील राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले.

Copy