चाळीसगाव महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

0

चाळीसगाव । येथील आर्टस्, सायन्स व कॉमर्स महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेल्लन नुकतेच पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मॅनेजींग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल, प्रमुख अतिथी शहर पोनि आदिनाथ बुधवंत, व्हाईस चेअरमन ज.मो.अग्रवाल, उपाध्यक्ष संजय पाटील, सिनिअर कॉलेज कमिटी चेअरमन डॉ.एम.बी.पाटील, सचिव वसंत चंद्रात्रे, माजी आमदार साहेबराव घोडे, गोपाल भाऊ दायमा, प्राचार्य डॉ.पी.एस.बाविस्कर, कलामंडळ प्रमुख प्रा.लोंढे, विदयापीठ सचिव कु. स्नेहा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

यावर्षीच्या विद्यापीठाच्या युवा रंग कार्यक्रमात महाविद्यलयास भारतीय लोक गीतास सुवर्ण पदक मिळाले. सुवर्ण पदक विजेती विद्यार्थिनी कु आरती पाटील हीच सत्कार यावेळी करण्यात आला. 26 जानेवारीच्या दिल्ली येथील परेडसाठी एनसीसी विभागातर्फे 3 विद्यार्थ्यांची निवड झालेल्या विद्यार्थी अशोक महाजन, राहुल पाटील, अनिल परदेशी यांचा प्रा.राजेश चंदनशिव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोनि आदिनाथ बुधवंत यांनी संमेल्लनाचे उद्घाटन करण्यात आले. म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे. जे काम मिळाले त्याला कमी समजू नये, शिस्तीचे पालन करून भावी आयुष्यात यशस्वी व्हा, असे सांगत दिल्ली परेडसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यांनी घेतले परीश्रम

अध्यक्षीय भाषणातून नारायण अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्या नंतर विद्यार्थ्यांचा आवडता विविध कलागुण दर्शनाचा कार्यक्रम संपन्न होऊन श्री गणेशा या गीताने तुषार मुजुमदार, स्वप्नील भामरे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमात लावणी, समूह गीत, शास्त्रीय नृत्य, डान्स, सोलो गीत, समूह नृत्य, वेस्टन सोंग आदी सादरीकरण करण्यात आले. प्रा. प्रदीप रॉय यांनी विनोदी चुटके सांगून उपस्थितांची करमणूक केली. सूत्र संचालन प्रा किरण गंगापूरकर यांनी केले तर आभार प्रा. डी. एल. वसईकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य, प्रा. मुठाणे, प्रा लोंढे, प्रा अजय काटे, प्रा सुभाष भिंगारे यांच्या सह सर्व प्राध्यपक, प्राध्यापिका, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 1 मे च्या पोलीस ग्राउंड मधील परेडमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.