चाळीसगाव बाजार समितीकडून शेतमाल तारण कर्जाची सोय

0

सभापती रवींद्र पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप

चाळीसगाव- कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या योजनेनुसार सोमवारी शेतकरी विजयकुमार कलंत्री या शेतकर्‍याने वखार महामंडळाकडे ठेवलेला आपला सोयाबीन हा शेतमालाच्या पावतीवर कृषी उत्पन्न बाजार समिती ने 50 हजार रुपयांचा शेतमाल तारण कर्ज योजना धनादेश आज सुपूर्द केला आहे यावेळी सभापती रवींद्र पाटील उपसभापती महेंद्र पाटील माजी सभापती अड.रोहिदास पाटील ज्येष्ठ संचालक प्रदीप देशमुख संचालक कल्याण पाटील ,धर्मा काळे ,जितेंद्र वाणी ,प्रकाश पाटील, बळवंतराव वाबळे व संचालक मंडळ उपस्थित होते तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपला शेतमालास अपेक्षित भाव मिळेपर्यंत वखार महामंडळाच्या गोडावून मध्ये ठेवला आहे या शेतमालाला योग्य भाव मिळेपर्यंत त्या पावतीवर 70 ते 75 टक्के कर्जाची सोय करण्यात आली आहे अपेक्षित भाव मिळेपर्यंत वखार महामंडळाचे भाडे बाजार समिती भरणार आहे अशी माहिती बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील यांनी जनशक्ती शी बोलताना दिली तर संपूर्ण योजनेची माहिती बाजार समिती कार्यालयात उपलब्ध असून त्याचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा, अशी माहिती प्रभारी सचिव अशोक पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे