चाळीसगाव पंचायत समितीच्या माजी सभापतीस मारहाण

0

चाळीसगाव। जेवणाला बोलावले नाही म्हणून एकाने चाळीसगाव पंचायत समितीच्या माजी सभापतीला त्यांचे हिरापूर रोड वरील घरी 27 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता मारहाण करून त्यांच्या बोटावर बाटली मारून दुखापत केली तर त्यांच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घेतली.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पंचायत समितीचे माजी सभापती विजय झामसिंग जाधव (वय 41, रा.नवीन नाका, चाळीसगाव)27 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांचे घरी असतांना आरोपी मनोज भोसले रा चाळीसगाव हा त्यांचे घरी आला व मला जेवणास का बोलावले नाही या कारणावरून त्यांना छातीवर, तोंडावर लाथा बुक्यांनी मारहाण केली तर त्यांच्या उजव्या हाताच्या बोटावर बाटली मारून दुखापत केली. तसेच त्यांच्या पत्नीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी मनोज भोसले यांचे विरोधात गुन्हा दाखल केला.