चाळीसगाव न.पा. प्रभागात विकास कामांना सुरूवात

0

चाळीसगाव । येथील प्रभाग क्रमांक 4 च्या नगरसेविका जनाताई यशवंतराव सोनवणे यांनी शास्त्री नगरमधील सुवर्णाताई देशमुख मार्गच्या ओपन स्पेसची स्वखर्चाने जेसीबी मशिनद्वारे साफसफाई करण्यात आली. या निमित्ताने प्रभागातील नागरीकांकडून समाधान व्यक्त होत आहे. रंजनाताई यांनी नुकताच चाळीसगाव नगरपालिकेत नगरसेविकेचा पदभार स्वीकारला. त्यांची शिक्षण समितीच्या व महिला बालकल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल प्रभागातील नागरिकांनी विशेषतः महिलांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

रोटरी मिलेनियमतर्फेही सहकार्य
यावेळी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधून जास्तीत जास्त समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. मागील आठवड्यातदेखील रंजनाताई यांनी शास्त्रीनगर मधील दुर्गादेवी मंदिरास चार बाकडे स्वखर्चाने दिले होते. जेसीबीद्वारे साफसफाई करण्यासाठी रोटरी मिलेनियम मार्फत सेक्रेटरी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी सहकार्य केले. प्रसंगी परिसरातील जेष्ठ नागरिक गुरव आण्णा, यशवंतराव सोनवणे , विवेकानंद कोतकर, मधुकर साळुंखे, देवचंद महाजन, आत्माराम पाटील, आण्णासाहेब सुर्वे, तुकाराम पाटील, मुख्याध्यापक कैलास सोनवणे, प्रशांत चौधरी, डॉ.मनोज चौधरी, रामदास पवार, बापूराव देसले, अंधशाळेचे सचिन सोनवणे, अहिरे सर (भामरेकर), निलेश देशमुख, शशांक सुर्यवंशी, स्वप्निल सोनार, गौरव पाटील यांच्यासह अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.