चाळीसगाव तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत बालीकेसह एकाचा मृत्यू

0

चाळीसगाव – तालुक्यातील खरजई येथील १० वर्षीय बालीकेचा पाण्यात बुडुन तर लोंजे येथील ६० वर्षीय ईसमाचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ५ ऑक्टोंबर रोजी घडली असुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील खरजई येथील १० वर्षीय बालीका कुमारी कोमल गुलाब वैराळे ही तिची आत्या निताबाई यांच्या सोबत तरवाडे गावठाण शिवारातील पाण्याच्या खदानीत धुणे धुण्यासाठी गेली होती धुणे धुत असतांना पाण्यात पाय घसरुन पाण्यात बुडुन कोमलचा दुपारी १२ वाजेच्या सुमारास मृत्यु झाला आहे. तर तालुक्यातील लोंजे येथील मदन मांगु राठोड (६०) यांचा राहते घरात घळफास घेतल्याने दिनांक ५ रोजी सायंकाळी ४ वाजेपुर्वी मृत्यु झाला असुन त्यांच्या नातेवाईकांनी सायंकाळी त्यांचा मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात आणला याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस नाईक शांतीलाल पगारे करीत आहेत.