Private Advt

चाळीसगाव तालुक्यातील विवाहितेचा विनयभंग करीत ठार मारण्याची धमकी : एकाविरोधात गुन्हा

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील एका गावात 28 वर्षीय विवाहितेला जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी महेंद्र सीताराम साळुंखे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणारी 28 वर्षीय विवाहिता शुक्रवार, 10 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना गावातील संशयीत आरोपी महेंद्र सीताराम साळुंके याने विवाहितेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे शिवाय जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी विवाहितेने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून आरोपी महेंद्र साळुंखे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.फौजदार अविनाश पाटील करीत आहे.