चाळीसगाव गुटखा प्रकरणात एलसीबीच्या सात कर्मचाऱ्यांसह एक अधिकारी निलंबित

0

जळगाव ; चाळीसगाव तालुक्यातील गुटख्याचा ट्रक प्रकरण कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले असून या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या सात कर्मचाऱ्यांसह मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी ही कारवाई केली असून याबाबतचे आदेश पारित करण्यात आले आहे .

निलंबित करण्यात आलेल्या कर्मचार्यांमध्ये मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार नारायण पाटील, हवालदार रामचंद्र बोरसे, प्रवीण हिवराळे, महेश पाटील, मनोज दुसाने, मुख्यालयाचा नटवर जाधव व मेहुणबारे पोलीस ठाण्याचा रमेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.