चाळीसगाव कृउबातून मोटारसायकल लंपास

0

चाळीसगाव – शहरातील कृषी उत्पन्न बाजर समितीतुन शेतकऱ्याची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला आज दिनांक १ रोजी भडगाव येथील आरोपीवर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तालुक्यातील भामरे बु येथील शेतकरी रविंद्र शिवाजी पाटील (२४) हे चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक ३ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ९ वाजता म्हैस विकत घेण्यासाठी त्यांची २० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच१९, एएम ३९७०) मोटारसायकल वर आले होते\ सकाळी १० वाजता कृउबासच्या ऑफिस समोर मोटारसायकल लावुन ते म्हैस बघण्यासाठी बाजारात गेले ११ वाजता परत आले असता त्यादरम्यान अज्ञात आरोपीने त्यांची मोटारसायकल चोरुन नेली होती. त्यांनी सर्वत्र याबाबत शोध घेतला असता भडगाव पोलीसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात आरोपी शफीक खान अन्वरखान (२४) रा पठाण मोहल्ला भडगाव ता भडगाव यास अटक केली होती त्याने चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतुन वरील टारसायकल चोरली असल्याची कबुली देउन ती मोटारसायकल भडगाव पोलीसांना काढुन दिली होती याची माहिती मिळाल्यावरुन त्यांनी भडगाव येथे जावुन खात्री केली व आज दिनांक १ ऑक्टोंबर २०१८ रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरुन आरोपी शफीक खान अन्वरखान (२४) याचे विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.