चाळीसगाव अंधशाळेच्या शिक्षकाचा सपत्नीक सत्कार

0

चाळीसगाव : ओबीसी विद्यार्थी, शिक्षक, पालक विकास असोसिएशन धुळेतर्फे 28 नोव्हेंबर महात्मा जोतीराव फुले स्मृती दिन शिक्षक दिन निमित्ताने शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या शिक्षकांना नाशिक विभागस्तर गुरुगौरव पुरस्काराने शहरातील धो.शा. गरुड वाचनालय धुळे येथे प्राथमिक, माध्यमिक, विशेष शिक्षक म्हणून काम करणार्‍या 70 शिक्षकांना गौरविण्यात आले आहे.

राष्ट्रीय अंधशाळा चाळीसगाव येथे विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सचिन सोनवणे यांच्या अंध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक पदवीधर मतदार संघाचे शिक्षक आमदार सुधीर तांबे यांच्याहस्ते सपत्नीक गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन अ‍ॅड.ललिता पाटील, शिक्षक आमदार सुधीर तांबे, ओबीसी असोशिएशनचे अध्यक्ष विलासराव पाटील, संभाजी पगारे यांच्याहस्ते झाले.

शिक्षकाचा सर्व स्तरावरून अभिनंदन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोशिएशनचे विलासराव पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य रामकृष्ण खलाने, असोशिएशनचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सचिव ईश्वर महाजन, निसर्गमित्र व्ही.एम. सोनवणे, आर.एस. बाविस्कर, एस.बी. चौधरी, सुशील महाजन आदी उपस्थित होते. सचिन सोनवणेंना पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.एम.बी.पाटील, चिटणीस कृषिभूषण अरुणजी निकम, उपाध्यक्ष डॉ.संजय देशमुख, दुय्यम चिटणीस संजय रतनसिंग पाटील आदींनी कौतुक केले. शाळेच्या मुख्यध्यपिका प्रभा मेश्राम यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.