Private Advt

चाळीसगावात 13 लाखांचा गांजा जप्त : दोघांना अटक

चाळीसगाव : चाळीसगाव पोलिसांनी संयुक्त कारवाईत सुमारे 13 लाख रुपये किंमतीचा गांजा स्कॉर्पिओ वाहनातून संशय आल्यानंतर जप्त केल्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली. सोमवारी सायंकाळी विराम लॉन्ससमोर ही कारवाई करण्यात आली.

संशय आल्यानंतर वाहन ताब्यात
चाळीसगाव शहर वाहतूक शाखा व ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे धुळे रोडवरील विराम लॉन्स समोर सोमवार, 18 एप्रिल रोजी संध्याकाळी विना क्रमांकाची पांढर्‍या रंगाची स्कार्पिओ आल्यानंतर त्यातून उग्र वास येताच तिची तपासणी केल्यानंतर त्यात 13 लाख 36 हजार चारशे रुपये किंमतीचा 62.066 किलो वजनाचा गांजा आढळल्याने तो जप्त करण्यात आला. चाळीसगाव ग्रामीण पोलिस व शहर वाहतूक पोलिसांनी या प्रकरणी तुषार अरुण काटकर (28, रा. दत्तवाडी, ता.चाळीसगाव) व सुनील देविदास बेडीस्कर (38, रा.पिलखोड, ता.चाळीसगाव) या दोघांनाअटक केली. चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी कैलास गावडे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक रमेश चव्हाण, वाहतूक शाखेचे हवालदार श्रीराम पोपट बोरसे, नाईक सचिन देविदास अडावदकर, नाईक बापू काशीनाथ पाटील, नाईक दीपक पितांबर पाटील, नाईक नरेंद्र महादू पाटील, चालक हवालदार रावसाहेब नामदेव पाटील व चाळीसगाव ग्रामीणचे पोलिस नाईक शांताराम सीताराम पवार, नाईक गोवर्धन राजेंद्र बोरसे, नाईक ज्ञानेश्वर काशीनाथ बडगुजर, नाईक देविदास संतोष पाटील, नाईक दिनेश विक्रम पाटील, नाईक प्रेमसिंग नरसिंग राठोड व चालक एएसआय अनिल आगोणे आदींनी केली.