चाळीसगावात विजयचा सत्कार

0

चाळीसगाव : तालुक्यातील सायगावचे सुपुत्र यांनी पुणे वारजे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत तिसर्‍यांदा महाराष्ट्र केसरी पद मिळविल्याबद्दल येथील अहिल्यादेवी मित्र मंडळाच्या वतीने व सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आज बुधवार 14 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता रांजणगाव दरवाज्याजवळील अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळ्याजवळ त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम पैलवान विजय चौधरी यांचे हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकातून सह्याद्री प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा पत्रकार दिलीप घोरपडे यांनी विजय चौधरी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी सायगाव सह चाळीसगाव तालुका, जळगाव जिल्ह्याची मान उंचावली असल्याचे सांगितले.

विजय चौधरी यांनी नोकरी देण्याची मागणी
महाराष्ट्र केसरी विजेता विजय चौधरी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मत करून कुस्तीमध्ये यश संपादन केले असून तब्बल तीन वेळा महाराष्ट्र केसरी पद मिळविणारे जिल्हयातील पहिलेच पैलवान आहे. त्यांनी एवढयावरच न थांबता ऑपलम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून यश संपादन करावे अशा तालुकावासियांसह महाराष्ट्रातील नागरीकांची असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. त्याचप्रमाणे विजय चौधरी हे दुसर्‍यांदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना चांगल्या नोकरीचे आश्वासन दिले होते मात्र त्यांनी अद्याप नोकरी दिली नाही. विजय चौधरी हे तिसर्‍यांदा महाराष्ट्र केसरी झाल्याने आता तरी त्यांनी नोकरी संदर्भात दिलेले आश्वासन शासनाने पाळावे व त्यांचा चांगल्या हुद्द्याची नोकरी देऊन त्यांचा सन्मान करावा ही अपेक्षा चाळीसगाव वासियांच्या वतीने दिलीप घोरपडे यांनी प्रास्ताविकातून केली.

ऑलम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व करण्यासाठी दिल्या शुभेच्छा
चाळीसगावचे पैलवान व विजय चौधरी यांचे मार्गदर्शक सहकारी यांनी त्यांच्या स्वतःच्या व विजय चौधरी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी कुठून व कसे यश संपादन केले याची माहिती उपस्थितांना दिली. तसेच महाराष्ट्राच्या नामवंत पैलवान हे कुस्तीचा कसा सर्व करतात त्यांची व्यायाम करण्याची पद्धत कशी हे आम्ही चोरून व खिडकीतून बघून तसेच सराव आम्ही करत होतो असे सांगून ज्या पैलवानांचे चोरून अवलोकन केले आज त्यांनाच विजयने मागे टाकून एक नव्हे तर तिसर्‍यांदा महाराष्ट्र केसरी पद पटकावून तालुका वासियांची मान उंचावली आहे. असे सांगून विजय चौधरी यांनी ऑलम्पिकमध्ये देखील यश संपादन करावे व तेथेही विजय मिळवावा अशा शुभेच्छा दिल्या.

सत्कारप्रसंगी यांची उपस्थिती
नगरसेवक नाना कुमावत, मल्हार सेनेचे शहराध्यक्ष पांडुरंग बोराडें तसेच रर्वीं कैलास आगोने, मछिंद्र आगोने, पो कॉ. पैलवान विजय शिंदे, सह्याद्री प्रतिष्ठान चे पपू राजपूत, रवींद्र सूर्यवंशी, विजय गायकवाड, किरण घोरपडे, दिनेश घोरपडे, अजय जोशी, सूर्यकांत कदम, मुराद पटेल, आरिफ खाटीक, राहुल सोनवणे, रवींद्र आगोने, संतोष आगोने, पोपट आगोने, युवराज आगोने, भागवत बच्छे, दिलीप गायकवाड, दिनेश गायकवाड, उत्तम चौघुले, मनोज कोळी, रमेश रावते, किशोर आगोने, दगा रावते, भिला पैलवान, सोमनाथ आगोने, देविदास आगोने, भागवत आगोने, योगेश साबळे आदी उपस्थित होते.