Private Advt

चाळीसगावात वाहने फोडून चार लाखांचे नुकसान : सात जणांविरोधात गुन्हा

चाळीसगाव : दुचाकीला कट लागल्यानंतर वाद वाढल्याने पाच संशयीतांनी तलवार व कोयत्याच्या धाकावर दहशत निर्माण करीत उभ्या असलेल्या कार, बुलेटसह दुचाकीचे सुमारे चार लाखांचे नुकसान केले. ही बाब शुक्रवार, 22 रोजी दुपारी तीन वाजता घडली. चाळीसगाव पोलिस ठाण्यात पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चार लाखांचे नुकसान
तक्रारदार चारुदत्त नानाभाऊ पवार यांचा मुलगा राम याच्या दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन संशयीत सिद्धांत आण्णा कोळी, सौरभ आण्णा कोळी, रोकडे पूर्ण नाव माहित नाही तसेच नवरे, जाधव पूर्ण नाव माहित नाही व इतर दोन अनोळखींनी शुक्रवार, 22 रोजी जयशंकर नगरातील चारुदत्त पवार यांच्या राहत्या घरी हातात लोखंडी तलावर, कोयते घेवून दहशत निर्माण केली तसेच शिविगाळ करीत उभ्या असलेल्या कारसह बुलेट व दुचाकीची तोडफोड केल्याने चार लाखांचे नुकसान झाले.

पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी चाळीसगाव पोलिसात चारुदत्त पवार यांच्या फिर्यादीवरुन सिद्धांत आण्णा कोळी, सौरभ आण्णा कोळी, रोकडे पूर्ण नाव माहित नाही, तसेच नवरे, जाधव पूर्ण नाव माहित नाही व इतर दोन अनोळखी मुले यांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक संजय कापडणीस करीत आहेत.