चाळीसगावात मेडिकल दुकान फोडले ; साडेचार लाखांची रक्कम लांबवली

0

चाळीसगाव- शहरातील स्टेशन रोड परीसरातील सीटी प्राईड मेडिकल अज्ञात चोरट्यानी फोडत दुकानाच्या ड्रावरमधून सुमारे साडेचार लाखांची रक्कम लांबवण्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. शनिवार बाजारचा दिवस असल्याने व्यापारांना देणे देण्यासाठी मेडिकल दुकानदार योगेश येवले यांनी ही रक्कम आणले होती मात्र वाणी मंगल कार्यालयात कार्यक्रम असल्याने उशीर झाल्याने रक्कम तशीच दुकानात राहिली व चोरट्यांच्या नेमक्या पथ्थ्यावर ही बाब पडली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांची छबी कैद झाली असून त्याआधारे चोरट्यांचा शोध घेतला जात असल्याचे चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव म्हणाले.

Copy