Private Advt

चाळीसगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

चाळीसगाव : अज्ञात भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना पातोंडा-ओझर रस्त्यावर शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या अपघातात औरंगाबाद येथील ऋषीकेश चंद्रकांत दत्तात्रेय (37) या तरुणाचा मृत्यू झाला.

धडकेनंतर अज्ञात वाहनधारक पसार
चाळीसगाव शहरातील पातोंडा-ओझर रस्त्यावर अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत औरंगाबाद येथील ऋषीकेश चंद्रकांत दत्तात्रेय (37) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार, 24 रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालका वाहनासह पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाचे चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.