Private Advt

चाळीसगावातील युवकाचा अपघातात मृत्यू

भुसावळ/चाळीसगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत शहरातील साई नगर विमानतळ परीसरात चेतन शिवराम थोरात (35, रा.साईनगर, चाळीसगाव) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत्यूची नोंद चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली.

रस्त्यातच झाले निधन
चेतन शिवराम थोरात (35, रा.साईनगर, विमानतळजवळ, चाळीसगाव) हे एका अपघात जखमी झाल्याने त्यांचे नातेवाईक संजय ठाकरे यांनी चाळीसगाव रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पूर्वी रस्त्यातच चेतन थोरात याचां मृत्यू झाल्याचे चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी केले. वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीनुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक संदीप माने करीत आहेत.