Private Advt

चाळीसगावजवळ पुन्हा अपघात : टँकर धडकेत दुचाकीस्वार ठार

चाळीसगाव : औरंगाबाद येथील दुचाकीस्वार पातोंडा-ओझर रस्त्यावर शुक्रवारी रात्री ठार झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी दुपारी पुन्हा नांदगाव रोडवर भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार झाला. या प्रकरणी पोलिसात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. अंबादास धर्मा पानसरे (32, शिंदी, ता.चाळीसगाव) अये दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अपघातानंतर पोलिसांची धाव
चाळीसगाव तालुक्यातील नांदगाव रोडवरील तळेगाव जवळील खंडेराव माथाजवळ भरधाव टँकर (क्रमांक एम.एच.28 ए.बी. 7321) ने दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी.टी. 7923) जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तालुक्यातील शिंदी येथील अंबादास धर्मा पानसरे (32) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी 12.40 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, टँकर चालक गणेश सुर्यभान सोनूने (रा.सोयगाव, जि.बुलढाणा) यांच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी चालकास अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली भालचंद्र पाटील करीत आहेत.