चाळीसगावच्या साद फाऊंडेशनचे संशोधन पेपरचे सादरीकरण

0

चाळीसगाव – सातवी महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद १५ ते १७ नोव्हेंबर २०१८ राज्य स्तरावरीय परिषद कोल्हापूर येथे संपन्न झाली या परिषदेत ५०० पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. या परिषदेत महिलांच्या विविध प्रश्नांवर, आरोग्यावर विविध अंगांनी चर्चा करण्यात आली. या परिषदेत ‘स्रियांचे मानसिक आजार एक अभ्यास’ संशोधन पेपरचे सादरीकरण साद फाऊंडेशन चाळीसगावच्या विजया चव्हाण, वैशाली निकम यांनी केले. त्यांना सहकार्य विजया ठाकुर, मंदा कांबळे, संदीप पाटील, पवन राठोड, कल्पेश देशमुख, सागर नागणे, दिलीप चव्हाण डॉ. पायल पवार यांनी केले.

Copy